सर्दी साठी औषध काय?HealthPlanet

Posted on Mon 28th Nov 2022 : 16:49

सर्दी-पडसे झाले आहे? ट्राय करा हे घरगुती उपाय

सर्दी-पडसे होणे आज काल खूप नेहमीचे झाले आहे. थंडीच्या दिवासात तर सर्दी -पडसे होणे सहाजिक आहे. सर्दी-पडसे होण्यामागे नेहमी काही ना काही कारण असते. सर्दी पडसे कोणत्याही एका वायरसमुळे नव्हे तर वेगवेगळ्या व्हायरसमुळे होऊ शकते. सर्दी पडसेची लक्षण पाहून त्यावर औषध दिले जाते. त्यामुळे या संसर्जजन्य आजारासाठी उपाचारा पेक्षा काळजी घेतलेली केव्हाही उत्तम मानले जाते. सर्दी पडसे होऊ नये म्हणून घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला या आजारांपासून दुर राहता येईल.

सर्दी डसे झाल्यावर होणारा त्रास/लक्षणे
 - सतत डोक दुखणे
- नाक गळणे
- शिंका येणे
- डोळ्यांची आग होणे, खाज सुटणे
- अंग भरुण येणे
- घशात सारखा कफ जमा होणे
- या सर्व लक्षणांनंतर आलेला ताप

मध खा :
संसर्ग रोखण्यास आणि विषाणुच्या वाढीस प्रतिबंध करण्यासाठी मध अतिशय उपयुक्त ठरते. पडसे झाल्यानंतर तुम्ही दिवसातून २ ते ३ वेळा मध खायला हवे.
 
दिवासातून तीन वेळा एक-एक चमचा मध खाले पाहिजे. किंवा दुधात मध मिसळून प्यावे पण, खोकताना श्‍लेष्मा(मेद) बाहेर पडत असेल तर दुध घेऊ नय.
 
दिवासातून ३ वेळा मध प्यावे. तहान लागल्यावर कोमट पाणी प्यावे. घसा दुखत असल्यास तोडांत लवंग ठेवून चघळावी.

मध आणि आल्याचा चहा
आल्यामध्ये संसर्ग रोखण्यास आणि विषाणुच्या वाढीस प्रतिबंध करण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळेच घसा, छाती आणि डोके दुखत असल्यास आल्याचे सेवन केल्यास फरक पडतो आणि पडसे पसरवणारे विषाणुनाचा नाश होतो. 

मध आणि आल्याचा चहा बनविन्यासाठी एक कप पाणी घ्या. त्यासाठी एक इंच आल्याचा तुकडा आणि दिड चमचा मध घ्या. सर्वात आधी पाणी गरम ठेवा. त्यात खिसलेले आले टाकून २ मिनटे उकळून घ्यावे. त्यांनतंर पाणी गाळून घेऊन थोडे थंड करा आणि त्यानंतर त्या मध टाका. मध आणि आल्याचा चहा तयार आहे. सर्दी पडसे झाल्यास दिवसातून दोन वेळा हा चहा नक्की घेऊन पहा.

गुळण्या करा आणि वाफ घ्या
 सर्दी - खोकला झाल्यास गुळण्या करणेआणि वाप घेणे अत्यंत फायदेशीर ठरते. त्यामुळेच जेव्हा खोकल्यामुळे घसा दुखत असेल तर मीठ टाकून गरम पाण्याने गुळण्या कराव्या.

सर्दीमुळे नाक बंद असल्यास गरम पाण्यात विक्स किंवा कोबीची पाने टाकून वाफ घ्यावे. नाक आणि तोंडावाटे वाफ घ्यावी. त्यामुळे बंद नाक, डोकेदुखी आणि घसा दुखी कमी होण्यास मदत होते.

या छोट्या छोट्या उपयांमुळे तुम्हाला सर्दी- खोकला- पडसे झाल्यासा फायेदशी ठरु शकतात.



solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info